Advertisement

१०० दिवसांत वाहतूक सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन, प्रवासी संघटनांचा रेल्वेला इशारा

मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचंही रेल्वे अधिकाऱ्या प्रवासी संघटनांना सांगितलं. त्यामुळं प्रवासी संघटनांनी १ जुलै रोजी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

१०० दिवसांत वाहतूक सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन, प्रवासी संघटनांचा रेल्वेला इशारा
SHARES

मागील अनेक दिवस मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळं विस्कळीत होतं आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना सतत लेटमार्कला सामेरं जावं लागतं. त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची बुधवारी तब्बल साडेतीन तासांची बैठक झाली.

या बैठकीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनानं मान्सून तयारी, उन्हाळी विशेष मेल, एक्स्प्रेस आणि तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वे उशीरानं चालविण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण प्रवासी संघटनेला दिलं. मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचंही रेल्वे अधिकाऱ्या प्रवासी संघटनांना सांगितलं. त्यामुळं प्रवासी संघटनांनी १ जुलै रोजी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक आश्वासनं

या बैठकीदरम्यान मध्य रेल्वे प्रशासनानं दिवा-कल्याण दरम्यान ५ वी ते ६ वी मार्गिकेच्या वापर मेल एक्स्प्रेस साठी करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या रुळांची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उचललेले कॉशन आॅर्डर कमी केलं जाईल. काही मेल एक्स्प्रेसला कल्याण ऐवजी पनवेल इथं वळविण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहेत. रेल्वे रुळाला क्रॉसिंग मध्ये दरड कोसळण्याच्या घटना थांबविण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांची मदत घेण्यात येणार आहे. लोकल सेवाची गती वाढविण्यात येणार आहे. रेल्वेचं वेळापत्रक सुधारण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल, असं आश्वासन रेल्वे प्रवासी संघटनांना देण्यात आलं आहेत.

'मरे' बदल घडवणार?

मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. १०० दिवसांच्या मुदतीत लोकल वक्तशीरपणात धावेल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, १०० दिवसात बदल झाला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे. त्यामुळं आता मध्य रेल्वे बदल घडवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळालं वर्सोवा-वांद्रे सी लींकचं कंत्राट

मध्य रेल्वेच्या मुंबई-शिर्डी मार्गावर 'ट्रेन १८' धावणार?Read this story in हिंदी or English
संबंधित विषय