सव्वा कोटी रुपयांचे सोने जप्त


सव्वा कोटी रुपयांचे सोने जप्त
SHARES

मुंबई  - एक कोटी 87 लाखांच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी गुन्हे शाखेने एका सराईत टोळीला अटक केली आहे. आरोपींच्या मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे आणि बेंगलोरमधील घरांवर छापे टाकून गुन्हे शाखेने सव्वा कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. १७ सप्टेंबरच्या रात्री सोन्याचे व्यापारी मुकेशकुमार संघवी (४६) हे पायधुनी परिसरातून टॅक्सीतून जात असताना चार लुटारुंनी लुट केली होती. पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात समांतर तपास करत असलेल्या गुन्हे शाखा कक्ष २ ने टॅक्सी चालक शहानवाज खान (२२) आणि जहांगिर शेख (२७) हे दोघेही गोवंडी, शिवाजीनगर येथून तर मुख्यसुत्रधार प्रफुल्ल गायकवाड याला मिरारोड येथील घरातून अटक केली. आरोपींजवळून पोलिसांनी दिड किलो सोन्याच्या दागिन्यांसह, दोन कार आणि एक मोटारसायकल असा एकूण ४५ लाखांचा ऐवज जप्त केला होता. तर पायधुनी पोलिसांनी नवी मुंबईच्या वाशी परिसरातून गुन्ह्यातील चौथा आरोपी रतन सिंग (२८) यालाही बेड्या ठोकल्या.

चारही आरोपींकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्यांच्या नवी मुंबईतील घऱातून १, ४०५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आरोपींनी बेंगलोर येथे विकण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या ३,२१४ ग्रॅम वजनाच्या सात विटा असा एकूण १ कोटी ३० लाख ३८ हजार १२७ रूपयांचा ऐवज जप्त केल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यत पावणे दोन कोटी रुपयांची मालमत्ता आरोपींजवळून हस्तगत केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा