राकेश मारियांची सीबीआयकडून चौकशी


राकेश मारियांची सीबीआयकडून चौकशी
SHARES

मुंबई - बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागानं मुंबईचे माजी पोलीस कमिशनर राकेश मारिया यांचीही चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. राकेश मारिया यांच्यासह सध्याचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भरती तसंच परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांचीही सीबीआयनं चौकशी केली आहे. या तिघांचीही प्रत्येकी सात ते आठ तास चौकशी झाल्याचं सांगण्यात आलं.

शीना बोराच्या हत्येचं प्रकरण समोर आलं तेव्हा राकेश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त होते, मात्र प्रमोशनच्या २२ दिवस आधीच त्यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. शीना बोरा हत्येप्रकरणी जातीनं लक्ष घातल्यानं त्यांची ही उचलबांगडी झाल्याची चर्चा होती. राकेश मारियांना मुंबई आयुक्तपदावरून थेट होम गार्ड्सच्या महासंचालक पदावर बसवण्यात आलं होत.
एप्रिल २०१२मध्ये २४ वर्षीय शीना बोराची हत्या झाली होती. मात्र हे प्रकरण २०१५ मध्ये उघडकीस आलं. शीना हत्येप्रकरणी सध्या तिची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पती पीटर मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना हे कोठडीत असून इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय माफीचा साक्षीदार झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा