Exclusive गैरहजर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील ६ पोलिसांवर गुन्हे दाखल

पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण वाढत आहे. असे असताना ही, वारंवार नोटीस बजावून देखील अशा परिस्थितीत गैरहजर राहणाऱ्या ६ पालिस कर्मचाऱ्यांवर बोरिवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Exclusive गैरहजर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील ६ पोलिसांवर गुन्हे दाखल
SHARES

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय आपत्ती घोषीत केली असताना. अत्यावश्यक सेवा बजावणारे प्रत्येक व्यक्ती जिवाची बाजी लावून या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी धडपडत आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्म चाऱ्यांच्या सुट्या या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. असे असताना ही, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात कामावर गैरहजर राहणाऱ्या ६ पोलिसांवर १४५ महाराष्ट्र पोलिस कायदा सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५६अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात एका महिला पोलिसाचाही समावेश आहे. विना परवानगी गैर हजर राहिलेल्या प्रकरणी या पूर्वी राज्य राखीव पोलिस दलाच्या(एसआरपीएफ) १७ जवानांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व राज्य राखीव पोलिस अधिनियमांतर्गत वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचाः- Unlock Maharashtra: पुन्हा लाॅकडाऊन की अनलाॅक?, राजेश टोपे म्हणाले…

कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पोलिस कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात  महत्वाची  भूमिका साकारत  आहे.  लॅकडाऊनच्या काळात सर्व सामान्यांची मदत करण्यासाठी किंवा त्यांना बाहेर प़डण्यापासून रोखण्यासाठी पोलिस दिवस रात्र झटत आहेत. आधीच पोलिस आयुक्तांनी ५५ वर्षावरील पोलिसांना कोरोना प्रादुर्भावामुळे घरी बसवले आहे. त्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात उर्वरित पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण वाढत आहे.  असे असताना ही, वारंवार नोटीस बजावून देखील अशा परिस्थितीत गैरहजर राहणाऱ्या ६ पालिस कर्मचाऱ्यांवर बोरिवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१, चे कलम १४५ आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५  कलम ५६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक पोलिस नाईक व पाच पोलिस शिपायांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिस शिपायाचाही समावेश आहे.

हेही वाचाः- KDMC: कल्याण-डोंबिवलीत कोरोना मृत्यूने शंभरी गाठली

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला  राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत केले आहे. अशात सर्व पोलिसांच्या सुट्या रद्दकरून त्यांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना ही, काहीपोलिस  कर्तव्यावर हजर  झाले नाही. अशा पोलिसांना परिमंडळ ११ च्या पोलिस उपायुक्तांनी  नोटीस ही बजावली. त्यानंतरही ते कर्तव्यावर हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक महिला पोलिस २०१८  पासून कर्तव्यावर उपस्थीत नव्हती. पण सध्या आपत्ती कायदा लागू करण्यात आल्यानंतरही कर्तव्यावर उपस्थित न राहिल्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय एक पोलिस शिपाई ३ जून पासून विलगीकरणात होता. त्यानंतर १६ जूनपासून तोही कामावर हजर झाला नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. तर एक पोलिस शिपाई ३१ मार्च पासून १० जूनपर्यंत गैरहजर होता. त्याबाबत कोणत्याही पोलिसांने कोणतीही परवानगी अथवा पूर्व कल्पना दिली नव्हती. त्यामुळे नोटीस व दूरध्वनी करूनही कर्तव्यावर गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात बोरीवली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे समजते. हे सर्व पोलिसांची नियुक्ती बोरिवली पोलिस ठाण्यात होती.  या प्रकरणी संबधित सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा