Advertisement

Unlock Maharashtra: पुन्हा लाॅकडाऊन की अनलाॅक?, राजेश टोपे म्हणाले…

राज्यात पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येईल की अनलाॅकच्या दिशेने वाटचाल सुरूच राहील, यावर सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

Unlock Maharashtra: पुन्हा लाॅकडाऊन की अनलाॅक?, राजेश टोपे म्हणाले…
SHARES

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पाचव्या टप्प्यातील देशव्यापी लाॅकडाऊनचा कालावधी येत्या ३० जून रोजी संपत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यासह देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण आकडेवारी कमालिची वाढल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येईल की अनलाॅकच्या दिशेने वाटचाल सुरूच राहील, यावर सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच खुलासा केला आहे. 

आता अनलाॅकच

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी खुलासा केला की, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार नाही तर आता अनलॉकच (unlock will continue in maharashtra says health minister rajesh tope) असेल. मात्र असं असताना जोपर्यंत कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस येत नाही तोपर्यंत राज्यातील जनतेला सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजेशन या 'एसएमएस' प्रणालीचा अवलंब करूनच अत्यंत सावधगिरीने रोजचे व्यवहार करावे लागतील. 

हेही वाचा - KDMC: कल्याण-डोंबिवलीत कोरोना मृत्यूने शंभरी गाठली

सर्वाधिक चाचणी

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोना चाचण्या कमी केल्या जात आहेत. कोरोनाबाधित आणि कोरोना मृत्यूंचा आकडा देखील लपवला जात आहे, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर होत आहे. त्याला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, मुंबई आणि पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या देशामध्ये सर्वाधिक आहे. कोरोना मृत्यूचे आकडे काही प्रमाणात पुढे मागे होत असले तरी सरकारने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. सर्व कारभार पारदर्शक असून विरोधकांनी मागणी केल्यास त्यांना आकडेवारी दिली जाईल. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.

मृत्यूदर कमी करणे

मुंबई आणि पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) आता नवे रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला आहे. परंतु, राज्याच्या इतर भागांत गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या नागरिकांच्या स्थलांतरामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या मुंबई, पुण्यातील परिसरात जुलै महिन्यांपर्यंत पुरतील इतक्या बेडची सुविधा आहे. जुलैत आढावा घेऊन पुढील तयारी करण्यात येईल. सध्या कोरोनाची वाढत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय नसून, मृत्यूदर कमी करणे, यावर आम्ही अधिक भर देत आहोत, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.  

हेही वाचा - माटुंगा, वांद्रे, दहिसरमध्ये पालिका करणार ‘सेरो’ सर्वेक्षण, 'हे' आहे कारण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा