MD ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

पोलिसांनी त्यांच्याजवळून हस्तगत केलेल्या अंमली पदार्थाची किंमत बाजारात सुमारे सहा लाख रुपये इतकी आहे

MD ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक
SHARES

 एमडी ड्रग्जच्या तस्करी करताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना दोघा जणांना रंगेहाथ अटक केली आहे.मोहम्मद खान (वय ४१), फिरोज खान (३९) अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शिवडी येथे आले होते. पोलिसांनी त्यांच्याजवळून हस्तगत केलेल्या अंमली पदार्थाची किंमत बाजारात सुमारे सहा लाख रुपये इतकी आहे. 

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शिवडीतील आर.ए.के. रोडजवळ मोहम्मद आणि फिरोज येत असल्याची खबर युनिट १०च्या पथकास मिळाली. त्यावरून युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने, सहाय्यक निरीक्षक धनराज चौधरी, हणमंत झोपेवाड आदींच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. दुपारच्या सुमारास दोन्ही आरोपी येथील एका हॉटेलसमोर उभे होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोन्ही आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे प्रत्येकी १०० ग्रॅम एमडी सापडले. या साठ्याची किंमत सुमारे सहा लाख रुपये इतकी आहे. दोन्ही आरोपींनी एमडीचा साठा कुठून आणला? त्याची विक्री ते कोणास करणार होते? याची चौकशी पोलिस करीत आहेत.

 १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ६४ कोटी ६४ लाख ६२ हजार ३५२ रुपये किंमतीचे १६९ किलो ४१५० ग्रॅम १२८२ मिली ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून, एकूण ६७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता मुंबईला नशेच्या विळख्याने कशा प्रकारे घेरले आहे. याचा अंदाज न लावलेलाच बरा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा