नशेसाठी सॅनिटायझरसाखरे लिक्विड प्यायल्याने दोघांचा मृत्यू


नशेसाठी सॅनिटायझरसाखरे लिक्विड प्यायल्याने दोघांचा मृत्यू
SHARES

लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून तळीरामांची मोठी वाताहात झाली आहेत. हिच दारूची तलप भागवण्यासाठी काहींना ना ना प्रयोग करून पाहिले. माञ हेच प्रयोग पालघरमध्ये दोघांच्या चांगलेच अंगलठ आले आहेत. पालघरच्या फलटण मध्ये सँनिटायझर लिक्विड प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे राज्यभरात सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्यातच काळ्याबाजारात दारूची किंमत म्हणजे खिशाला न परवडणारी. त्यामुळेच काही महाशयांनी आता नव नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. अट्टल दारूडे तर नशेसाठी ब्रेक आँईल, थिनर, सँनिटायझर लिक्विडचा वापर करू लागले आहेत. तर मेडिकलमध्ये खोकल्याच्या कप सिपरची ही मागणी वाढली आहे. वरील गोष्ठींमध्ये अलकोहोलचे प्रमाणमोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे सेवन केल्यास नशा चडते. त्याचाच फायदा हे नशखोर घेतात.

 नशेसाठी अशाच गोष्टीचे सोवन केल्याने पालघरमध्ये किरण सुरेश सावंत वय (30),दिपक राघु जाधव (32 )यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही मोलमजुरी करतात. काही दिवसापूर्वी ते पुणे जिल्ह्यातील राख या गावी डाळिंब छाटणीसाठी गेले होते. चार दिवसापूर्वी ते जिंती येथे आपल्या घरी आले या दोघांनीही ही जिल्हाबंदीच्या उल्लंघन केल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान हे दोघे घरापासून जवळच असलेल्या ओढ्या जवळ बसून कसलीतरी लिक्विड प्यायले. यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने फलटण येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले .

पुन्हा दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या दोघांचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कोणते लिक्विड प्यायले आहे हे समजेल. फलटण ग्रामीण ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा