तरुणीला ब्लॅकमेल करणारा अटकेत


तरुणीला ब्लॅकमेल करणारा अटकेत
SHARES

खारमध्ये उच्चभ्रूवस्तीत राहणाऱ्या तरुणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून तिचे न्यूड फोटो मिळवून ते सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देणाऱ्यास खार पोलिसांनी अटक केली आहे. समीर युसूफ घासवाला असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी न्यायालयाने समीरला पोलिस कोठडी सुनावली असून पोलिसांनी समीरचं सीमकार्ड आणि मोबाईल हस्तगत केलं आहे.


संपूर्ण प्रकार

खारच्या उच्चभ्रूवस्तीत राहणारी 16 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियासोबत राहते. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या मुलीची काही महिन्यांपूर्वी युसूफशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. कालांतराने या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अवघ्या काही दिवसात समीरने तरुणीचा विश्वास जिंकला होता. 

त्यानंतर ऐकेदिवशी त्याने तिला तिचे काही न्यूड फोटो शेअर करण्याची विनंती केली होती. हा ना करत तरुणीने समीरवर विश्वास ठेवत तिचे फोटो त्याला पाठवले. मात्र याच फोटोच्या मदतीने समीर काही दिवसांपासून पैसे आणि शारीरिक संबधांसाठी ब्लेकमेल करू लागल्याचं तरुणीला कळाल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी खार पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार खार पोलिसांनी गुजरातच्या सुरतहून समीरला अटक केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा