SHARE

नायगाव येथील पोलीस वसाहतीत महिला पोलीस कॉन्स्टेबलने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कॉन्स्टेबलच्या प्रियकराविरुद्ध गुन्ह्यांची नोंद केली आहे. मुकेश बोरके (२५) असं या तरुणाचं नाव असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचं भोईवाडा पोलिसांनी सांगितलं आहे.

नायगावच्या न्यू. बीडीडी चाळीत राहाणारी महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजू गायकवाडने (२२) मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. २०१४ साली पोलीस खात्यात भरती झालेली मंजू नायगावच्या शस्त्र विभागात कार्यरत होती.


काय आहे प्रकरण?

तिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मुकेश आणि मंजू यांचे २०१४ पासून प्रेमसंबंध होते. मंजूच्या कुटुंबाला या प्रेमसंबंधाची माहिती होती. मंजू आणि महेशच्या लग्नाला देखील त्यांचा विरोध नव्हता. मात्र लग्न करण्यास मुकेशने नकार दिल्यावर मंजू मानसिकदृष्टया खचल्याचं बहिणीने पोलिसांना सांगितलं. त्यातून आलेल्या नैराश्यातून मंजूने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बहिणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.


गुन्ह्याची नोंद

आम्ही प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद केला असून आमचा तपास सुरु असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली.

नायगाव येथील न्यू. बीडीडी चाळीत मंजू आपल्या दोन बहिणी आणि भावासोबत राहत होती. मंगळवारी मंजुची बहिणी भावाला डब्बा देण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये गेली असताना सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बहीण घरी परतेपर्यंत मंजूने साडीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या