बहिणीनं पळून जाऊन लग्न केल्यानं भावाची आत्महत्या

सहा महिन्यांपूर्वी बटुकेश्वरच्या बहिणीने रोहित सिंग या इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं. त्यामुळे बटुकेश्वर संतप्त झाला होता.

बहिणीनं पळून जाऊन लग्न केल्यानं भावाची आत्महत्या
SHARES

बहिणीने पळून जावून लग्न केल्याने एका भावाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली.  बटुकेश्वर त्रैलोकींनाथ तिवारी(३४) असं त्यांचं नाव आहे. स्वतःवर गोळी झाडून घेण्याआधी बटुकेश्वरने आपल्या बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळी झाडली. मात्र ते दोघेही बचावले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली. 

सहा महिन्यांपूर्वी बटुकेश्वरच्या बहिणीने रोहित सिंग या इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं. त्यामुळे बटुकेश्वर संतप्त झाला होता. सोमवारी बटुकेश्वर बहिणीच्या घरी आला होता. त्या वेळी त्याने बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळीबार केला. मात्र, दोघेही घराबाहेर पळाल्याने या हल्ल्यात वाचले. त्यानंतर बटुकेश्वर याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी त्याच्या बहिणीचा जबाब नोंदवला आहे.  त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनसाठी शताब्दी रुग्णलयात पाठवला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. हेही वाचा -

बोईसरमध्ये १२ बांगलादेशींना अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा