• बहिणीच्या लग्नासाठी भाऊ बनले चोर
  • बहिणीच्या लग्नासाठी भाऊ बनले चोर
  • बहिणीच्या लग्नासाठी भाऊ बनले चोर
SHARE

गोरेगाव - बहिणीच्या लग्नासाठी दोन भावांनीच मिळून मालकाच्या कार मधील पैसे चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सज्जन यादव आणि लल्लन यादव या दोन भावांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून 8 लाख 75 हजार रुपये जप्त केले आहेत. 

सज्जन यादव एका रेल्वे ठेकेदाराकडे कामाला होता. सज्जन 6 मार्चला 9 लाख रुपये मालकाच्या गाडीतून घेऊन जात होता. मात्र आरे युनिट नं 32 च्या जवळ अज्ञात व्यक्तींनी गाडीतील पैसे चोरल्याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता ही चोरी दुसऱ्या तिसऱ्या कुणी केली नसून, सज्जन आणि त्याच्या भावानेच बहिणीच्या लग्नासाठी हा चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या