ओशिवऱ्यात बिल्डरची धारदार शस्त्राने हत्या

 Oshiwara
ओशिवऱ्यात बिल्डरची धारदार शस्त्राने हत्या
ओशिवऱ्यात बिल्डरची धारदार शस्त्राने हत्या
ओशिवऱ्यात बिल्डरची धारदार शस्त्राने हत्या
See all

ओशिवरा - नालसोपारा येथील प्रसिद्ध बिल्डर आणि रिलायबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक अली असगर भानपुरवाला यांची एका अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हत्या केली. हा अज्ञात इसम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्यांच्या पत्नीवर देखली हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ती थोडक्यात वाचली.

अली असगर भानपुरवाला हे सकाळी घरी बसले होते. त्यावेळी कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच बुरखा घालून आलेल्या अज्ञात इसमाने तिला पकडले. बायकोचा ओरडण्याचा आवाज आल्यावर असगर बाहेर आले असता या अज्ञात इसमाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार आरोपी हा असगर यांच्या पत्नीचा पहिला पती असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अरगर यांना रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचं निधन झालं. असगर यांची पत्नी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी क्राईम ब्रांच अधिक तपास करत आहेत.

Loading Comments