इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी


इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी
SHARES

मुंबईच्या पायधुनी परिसरात जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या दुर्अघटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याचंही माहिती आहे.


कशी घडली घटना?

पायधुनी वाय एम रोडवरील ही जीर्ण अवस्थेतील तीन मजली इमारीत आहे. या इमारतीच्या खालून पायधुनी परिसरात राहणारा मोहम्मद अतीफ उल्ला हा रविवारी दुपारी जात होता. त्यावेळी इमारतीचा स्लॅब त्याच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत अतीफसह अन्य एक प्रवाशी जखमी झाला.

बेशुद्ध अवस्थेत पदपथावर पडलेल्या अतीफला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यावेळी डाॅक्टरांनी अतीफला तपासून त्याला मृत घोषीत केलं. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.हेही वाचा-

कांजूरमार्ग पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'ने आरोपीचा मृत्यू?

देशी कट्ट्यासह तरूणाला अटकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा