चोरट्यांनी देवालाही सोडलं नाही

Mumbai
चोरट्यांनी देवालाही सोडलं नाही
चोरट्यांनी देवालाही सोडलं नाही
See all
मुंबई  -  

चोरी करणाऱ्या नाइट गँग या टोळीने आता देवाला देखील सोडलेलं नाही. या टोळीने कांदिवलीतल्या साईनगरमधील एका मंदिरात चोरी केली आहे. यापूर्वी या टोळीने औषधाच्या दुकानांसह किराणा दुकानांत आणि एका रिक्शाची चोरी केली होती. पण रविवारी मध्यरात्री या टोळीतल्या चोरट्यांनी चक्क मंदिरातल्या दानपेटीतले पैसेच लांबवले.पॉवेल्स लँड किराणा दुकानाचे मालक रुपेश बोरांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास नाइट गँग या टोळीने आधी पूर्वा मेडिकल स्टोरचे टाळे तोडत लूटपाट केली आणि त्यानंतर एका किराणा दुकानाचे टाळे तोडून मोबाइलसह लाखों रुपयांची चोरी करत पळ काढला.

या दोन्ही चोरीच्या प्रकरणाबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. पण पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच रविवार रात्री या नाइट गँगने साईबाबा मंदिरातल्या दानपेटीतली रक्कमच पळवली. साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बैलू जाधव यांनी सांगितलं की, या टोळीतील चोरट्यांनी दानपेटीचे टाळे तोडत पेटीत असलेली सर्व रक्कम चोरी केली. मात्र दानपेटीत किती रक्कम होती याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.