कर्जबाजारी व्यावसायिकाने केला कुटुंबियांच्या हत्येचा प्रयत्न


कर्जबाजारी व्यावसायिकाने केला कुटुंबियांच्या हत्येचा प्रयत्न
SHARES

ठाण्यात कासारवडवली इथं झालेल्या भीषण हत्याकांडानंतर गोरेगाव येथे एका कर्जबाजारी व्यावसायिकाने आपल्या पत्नी आणि तीन मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसानी आरोपी उमेश गुप्ता याच्याविरोधत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार?

गोरेगावच्या तात्या टोपे नगर परिसपात राहणाऱ्या उमेश गुप्ताचं राजश्री लॉटरीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात इतरांपेक्षा उमेशनेच जास्त पैसे गुंतवत नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण या खेळात उमेश कर्जबाजारी झाला. उधारीवरचे पैसे चुकवू न शकल्याने अनेक लोक उमेशच्या शोधात होते. आपल्या कृत्यामुळे घरच्यांना त्रास होऊन नये. त्यामुळेच उमेशने कुटुंबातील तीन मुलं आणि पत्नीची हत्या करून स्वत:आत्महत्या करण्याचं ठरवलं.

पत्नी आणि मुलांची हत्या करण्यासाठी उमेशने बाजारातून चाकू खरेदी केला. बुधवारी रात्री जेऊन झाल्यानंतर दीडच्या सुमारास उमेशने त्याची पत्नी सिंधू हिच्यावर चाकूने वार केला. त्यावेळी सिंधूने आरडाओरडा केल्यानंतर उमेश यांची मोठी मुलगी निकीता (२४), अंकिता (२२), आणि १६ वर्षीय अंकीत जागे झाले. या तिघांनी उमेश यांच्या बेडरुमच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी उमेशने तिघांवर जिवघेणा हल्ला करत त्यांना जखमी केले. जखमी मुलं आणि सिंधू यांनी आरडा ओरडा केल्यानंतर शेजारीही जागे झाले. त्यावेळी घाबरलेल्या उमेशने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चौघांना टाकून तेथून पळ काढला. 

शेजाऱ्यांनी तातडीने सिंधू, अंकीता, निकीता आणि अंकीतला जवळील रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तोपर्यंत उमेश पोलिस ठाण्यात हजर होत त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार उमेशवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा