हातात कोयता घेऊन प्रवास करणं पडलं महागात, प्रवाशावर गुन्हा


हातात कोयता घेऊन प्रवास करणं पडलं महागात, प्रवाशावर गुन्हा
SHARES

एका बाजूला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना, लोकल ट्रेनमध्ये हातात कोयता घेऊन प्रवास करणं, कांदिवलीतील एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. भायखळा आरपीएफ पोलिसांनी या प्रवाशाला अटक करून त्याच्यावर बाॅम्बे पोलिस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अजय सोमनाथ पवार असं या आरोपीचं नाव आहे.


काय आहे प्रकरण?

कर्जत, खोपोलीतील मोकळ्या जागेवरील गवतांची छाटणी करून ते गवत भायखळाच्या बाजारात आणून विकणारा अजय पवार २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भायखळा स्थानकाच्या प्लॅटफाॅर्मवर हातात कोयता घेऊन उभा होता.


रागीट हावभाग

त्याचे हावभाव आणि रागीट चेहऱ्याकडे पाहिल्यास तो कुणावरही हल्ला करेल असं वाटत होतं. त्याचा हाच अवतार पाहून घाबरलेल्या एका महिला प्रवाशाने त्वरीत त्याचा फोटो काढून आरपीएफच्या ट्विटरवर टाकून तक्रार नोंदवली. त्यानुसार आरपीएफच्या नियंत्रण कक्षाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचे फोटो भायखळा आरपीएफला पाठवले आणि त्यानुसार तपासाला सुरूवात झाली.


'असा' आला ताब्यात

दरम्यान २४ डिसेंबर रोजी योगायोगाने हाच प्रवासी तक्रारदार संबधित तरुणीला पुन्हा भायखळा रेल्वे फलाटावर आढळून आला. त्यावेळी हातात कोयता असलेला हा प्रवासी मोठ मोठ्याने आरडा ओरडा करत होता. या जागरूक तरुणीने पुन्हा एकदा नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.


तपासात काय निष्पण्ण?

कांदिवलीच्या क्रांतीनगर परिसरात राहणारा अजय दररोज कर्जत, खोपोली परिसरातील मोकळ्या जागेवरील गवत कापून ते विक्रीसाठी भायखळा मार्केटमध्ये आणायचा. गवताच्या मुळीतून कोयता पडण्याची शक्यता असल्यामुळे तो कोयता कायम हातात ठेवत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. मात्र त्याच्या हातातील कोयता आणि भीतीदायक चेहऱ्याकडे पाहून तरुणीने त्याची तक्रार केल्याचं तपासाअंती पुढं आलं.

काहीही असलं तरी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रवाशाला बाॅम्बे पोलिस अॅक्ट अंतर्गत तुरूंगाची हवा खाली लागली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा