कार अपघातात एकाचा मृत्यू

 Jogeshwari
कार अपघातात एकाचा मृत्यू

जोगेश्वरी फ्लायओवरवर भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा सोमवारी रात्री अपघात झाला होता. यामध्ये कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले होते. यातील रोहन जानी(25) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर नजीकच्या ट्राॅमा केअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरू होते.   

मिळालेल्या माहितीनुसार बोरीवलीहून अंधेरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा टायर अचानक फुटला आणि कार पलटी झाली होती.  पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये कथित नॅशनल सिक्युरिटी अॅण्ड करप्शन क्राईम प्रिवेन्शन बोर्डाचे अधिकारी बसला होता. आणि यातील तिघांनीही दारू प्यायली होती. याप्रकरणी पोलिसांनी कलम 304(ए),279,338 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


Loading Comments