कारचोरटा अटकेत


कारचोरटा अटकेत
SHARES

टिळकनगर - चाकूचा धाक दाखवत कार पळवणाऱ्या सराईत चोराला गुरुवारी टिळकनगर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद हानिफ शेख (२१) असे या आरोपीचे नाव आहे.
टिळक नगर परिसरात राहणारे नसीम खान गुरुवारी छेडा नगर परिसरात उभे होते. त्यावेळी आरोपीने त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांची कार पळवली. खान यांनी या आरोपीचा रिक्षाने पाठलाग सुरू केला असता गाडी दुभाजकाला धडकली. त्यामुळे खान यांनी तत्काळ या आरोपीला पकडून देवनार पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र गुन्हा टिळकनगरच्या हददीतील असल्याने देवनार पोलिसांनी या आरोपीला टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा