सायकलवरून आला, कार घेऊन गेला

विद्याविहार - चोरट्यांनी चक्क कारच चोरलेय. विद्याविहार इथल्या फातिमा शाळेजवळील शकुंतला निवास इथे मारुती वॅगनार (MH-04-GJ-8326) नंबरची ही कार पार्किंगमध्ये उभी होती. मात्र 24 फेब्रुवारीला सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायकलवरून आलेल्या चोरट्यांनी रहदारी नसल्याचा फायदा घेत कार चोरी केली. या संदर्भात कारमालक जयेश पटेल यांनी चिरानगर पोलीस ठाण्यात कार चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.

चोरट्यांनी कशाप्रकारे कार चोरी केली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र पोलिसांना चोराला पकडण्यात विलंब होत असल्याचा आरोप कार मालक जयेश पटेल यांनी केला आहे. तर कार चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली असून पोलीस कारचा तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले.

Loading Comments