नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात गुन्हा

वाशी सेक्टर 9 येथील नूर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी दिल्ली येथून आलेल्या 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात गुन्हा
SHARES

वाशी सेक्टर 9 येथील नूर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी दिल्ली येथून आलेल्या 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फिलिपिन्स नागरिकांमुळे नवी मुंबईत कोरानाचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.  

दिल्ली येथून आलेल्या 10 पैकी 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र, त्यांनी प्रशासन आणि पोलिसांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता वाशीमध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या मशिदीतील मौलवीसह काही कर्मचारी व नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

मार्च महिन्यात दिल्ली येथील निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात फिलिपिन्स देशातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली येथील कार्यक्रम संपल्यानंतर 10 मार्च रोजी तबलिगी जमातीचे 10 फिलिपिन्स नागरिक वाशी सेक्टर-9 येथील नुरुल इस्लाम ट्रस्टच्या नुर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. ते 16 मार्चपर्यंत वाशीमध्ये वास्तव्यास होते. त्यातील 68 वर्षीय व्यक्तीसह तिघांना कोरोनाची लागण झालेली होताी. मात्र त्यांनी स्थानिक प्रशासन अथवा पोलिसांना याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

ज्या 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर इतर सात फिलिपिन्स नागरिक हे पुन्हा दिल्ली येथे परतले आहेत. या फिलिपिन्स नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची माहिती न देता वास्तव्य करुन त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 


हेही वाचा -

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...

मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क न केल्यास कठोर कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा