Advertisement

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी तबलिगी समाजातील नेत्यांची भेट घेऊन त्यांना समज दिली.

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...
SHARES

दिल्लीतील निजामुद्दीन (nizamuddin delhi) येथील कार्यक्रमाला हजेरी लाऊन महाराष्ट्रात परतलेल्या तबलिगी जमातीतील (tablighi jamaat) मुस्लिम बांधवांना शोधून काढत त्यांच्या कोरोनासंबंधी चाचण्या घेतल्या जात आहेत. तबलिगी समाजातील काहीजण वैद्यकीय सेवा देणाऱ्यांशी असहकार्य करत असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी तबलिगी समाजातील नेत्यांची भेट घेऊन त्यांना समज दिली. 

हेही वाचा - Coronavirus Updates: मंत्रालयात मास्कशिवाय प्रवेश नाही

मागील महिन्यात दिल्लीमध्ये निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीने मरकज या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं . मरकजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असं आवाहन पालिकेने केलं आहे. माहिती न देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

देशात कोरोनाबाधित (corona positive patient) रुग्णांची संख्या आता साडेतीन हजारांहून अधिक झाली आहे. त्यातील ५०० हून अधिकजण दिल्लीतील कोरोनाबाधिक रूग्ण आहेत. दिल्लीतील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के कोरोनाबाधित रुग्ण हे तबलिगी समाजाची संबंधित आहेत. दिल्लीतील निजामुद्दीन (nizamuddin delhi) येथील मशिदीत तबलिकी समाजाने (tablighi jamaat)आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात देशातील विविध ठिकाणचे ८ हजारांहून अधिक मुस्लिम बांधव (muslims) सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सगळेजण आपापल्या राज्यांत परतले. त्यांच्यातील काहीजणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक राज्यातील सरकारने या तबलिगी समाजातील लोकांचा तपास सुरू केला. 

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील १२२५ जण सहभागी झाले होते. त्यांची यादी दिल्ली सरकारकडून (maharashtra government) महाराष्ट्र सरकारला देण्यात आली. या यादीतील लोकांपैकी १०३३ व्यक्तींशी ४ एप्रिलपर्यंत संपर्क साधण्यात आला होता. त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आलं. त्यातील ७ जण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं. त्यातील पुणे, पिंपरी चिंचवड व अहमदनगर येथील प्रत्येकी २, तर हिंगोली येथील १ रुग्ण होता, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - राज्यात ५ लाख परप्रांतीय मजुरांच्या जेवणाची व्यवस्था- मुख्यमंत्री

विलगीकरण कक्षात (quarinetine ward) ठेवलेले लोकं वैद्यकीय कर्मचाऱ्या सहकार्य करत नसून त्यांच्या अंगावर थुंकत आहेत. उपचार करून घेण्यास नकार देत आहेत, जाणीवपूर्वक संसर्ग वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा स्वरूपाचं वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध होत होतं. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील तबलिगी समाजातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करून एक बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रशासनाला सर्व समाजाने सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. तबलिगी समाजातील नेत्यांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा