पालिकेच्या नाकावर टिच्चून ७३ कोटींची पाणीचोरी

आरोपींनी आतापर्यंत पालिकेच्या जागेत अनधिकृत विहीरी पाडून तब्बल ७३ कोटी १८ लाख ५६ हजार

पालिकेच्या नाकावर टिच्चून ७३ कोटींची पाणीचोरी
SHARES

वांद्रे, दहिसर, चारकोप, मालाड, विलेपार्ले, दक्षिण मुंबईत पाण्याची मोठी समस्या उन्हाळ्यात निर्माण होते. त्यात नागरिकांचे हाल होत असतानाच टँकर लॉबी मुंबईतील विहिरींचे पाणी उपसून करोडो रुपये कमावत असतात. असाच काहीसा प्रकार मुंबई महानगर पालिकेचे मुख्यालय असलेल्या आझाद मैदान परिसरात पुढे आला आहे. १२ वर्ष अनधिकृत खोदकाम केलेल्या दोन विहिरीतून ७३ कोटी रुपयांचे पाणी चोरल्याच्या आरोपाखाली आझाद मैदान पोलिसांनी जागेचा मालक, कंत्राटदार अशा ६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

काळबादेवी परिसरात राहत असलेले सुरेशकुमार जैन यांनी २००३ मध्ये बोमनजी मास्टर लेन, काळबादेवी पोस्ट आॅफीस शेजारी असलेली जागा त्रिपुराप्रसाद पांडे यांच्याकडून भाडे तत्वावर घेतली होती. या जागेत पांडे यांच्या दोन विहिरी होत्या. या विहिरीतून दररोज अनेक टँकर पाणी उपसा केला जायचा. त्यामुळे त्या परिसरात चिखल व्हायचा. याबाबत जैन यांनी मालकाकडे तक्रार केल्यानंतर मालकाने त्या दोन विहिरी भाड्याने मिश्रा यांना दिल्याचे कळाले. याबाबत जैन यांनी पालिका आणि प्रशासकीय व्यवस्थापनाकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता त्या दोन्ही विहीरी बेकायदेशीररित्या पाडण्यात आल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर त्यावर बेस्ट मीटर लावून पांडे यांनी अनधिकृतरित्या पाण्याची विक्री सुरू ठेवली होती.

आरोपींनी वर्ष २००६ ते आतापर्यंत ६.१० लाख टँकर पाण्याची विक्री केली आहे. यातील प्रत्येक टँकरची क्षमता १० हजार लिटरची असतो. एका टँकरची किंमत १२०० रुपये आहे. त्याप्रमाणे या आरोपींनी आतापर्यंत पालिकेच्या जागेत अनधिकृत विहीरी पाडून तब्बल ७३ कोटी १८ लाख ५६ हजार ६०० रुपयांची पाणी चोरी केल्याचे पुढे आले आहे. या प्रकऱणी सुरेशकुमार जैन यांनी दिलेल्या तक्रारनुसार आझाद मैदान पोलिसांनी त्रिपुराप्रसाद पंडया, प्रकाश त्रिपुराप्रसाद पंड्या, मनोज महेंद्रकुमार पंड्या, अरुण मिश्रा, श्रवण मिश्रा, थिरज मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या ‘भेळ क्वीन’चं निधन




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा