पीएनबीच्या आणखी 3 बड्या अधिकाऱ्यांना अटक


पीएनबीच्या आणखी 3 बड्या अधिकाऱ्यांना अटक
SHARES

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बँकेच्या आणखी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये चिफ मॅनेजर बच्चू तिवारी, सेल्स मॅनेजर यशवंत जोशी, सेल्स ऑफीसर प्रफूल सावंत यांचा समावेश आहे.

पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयसह ईडीने भारतात 39 ठिकाणी छापे टाकत 22 कोटींची मालमत्ता हस्तगत केली होती. या घोटाळ्यातील बच्चू तिवारी हा सुपरवायझरचं काम पाहात होता. व्यवहारांसाठी लागणारा स्विस नंबर बच्चू याच्या सिस्टममधून जात होता. हा व्यवहार चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं माहीत असताना बच्चू त्याकडे दुर्लक्ष का करत होता?, याची आता सीबीआय चौकशी करत आहे. तर दुसरा आरोपी यशवंत जोशी हा देखील गोकुळनाथ शेट्टी याच्याबरोबर सुपरवायजरचं काम पाहात होता. 

मात्र व्यवहारासाठी लागणारा स्विस नंबर आणि सीबीएस एंट्रीचा रिपोर्ट बनवण्याचं काम जोशीकडे होतं. हे काम दररोज व्यवस्थित होत आहे की नाही हे निदर्शनास आणून देण्याचं काम जोशीचं होतं. तर तिसरा आरोपी प्रफुल सावंत स्विस बँकेच्या डेली रिपोर्टची नोंद ठेवण्याचं पाहात होता. या तिघांचा निष्काळजीपणा आणि गुन्ह्यात सहभाग निश्चित झाल्यामुळे सीबीआयने या तिघांना अटक केली आहे. याचबरोबर या तिघांची कसून चौकशी सुरू असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.


हेही वाचा - 

पीएनबीच्या ब्रेडी हाऊस शाखेला सीबीआयनं ठोकलं टाळं

पीएनबी घोटाळ्यात ब्रँच मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीसह दोघांना अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा