पीएनबी घोटाळ्यात ब्रँच मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीसह दोघांना अटक


पीएनबी घोटाळ्यात ब्रँच मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीसह दोघांना अटक
SHARES

पंजाब नॅशलन बँकेत झालेल्या 11 हजार 300 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयने बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी अटक केली. हे तिन्ही कर्मचारी पीएनबीच्या मुंबईतील ब्रिचकँडी शाखेत कार्यरत होते. अटक आरोपींमध्ये तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक (डेप्युटी ब्रँच मॅनेजर) गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट यांचा समावेश आहे. लवकरच या तिघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.


नियमांचं उल्लंघन

यातील आरोपी मनोज खरात आणि हेमंत भट्ट हे नीरव मोदीच्या कंपनीत उच्चपदावर कार्यरत होते. बँकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणि त्यांचे सहकारी मनोज खरात यांच्यावर लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करताना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. शेट्टी आणि खरात यांनी 4 हजार 868.70 लाख कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


नीरव मोदीचा शोध सुरू

पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार 500 कोटींचा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीवर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं कळाल्यानंतर तो कुटुंबासह देशाबाहेर पसार झाला आहे. तपास यंत्रणांकडून नीरवची शोधाशोध सुरू असून तो न्यूयार्कमध्ये असल्याचं समजतंय. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शेट्टीच्या मालाड परिसरातील रुस्तमजी ओझन कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये जाऊन कुटुंबियांची तसेच शेट्टीच्या नातेवाईकांची गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस चौकशी केली. यावेळी शेट्टीने मोक्याच्या जागी खरेदी केलेल्या फ्लॅटसह त्याचे बँक खाते, लॉकर्स आणि इतर मालमत्तेसंदर्भात माहिती दिली. या घोटाळ्यात दोषी आढळलेल्यांना निलंबित करण्यात आल्याचं पीएनबीकडून सांगण्यात आलं आहे. या गुन्ह्यात अटक आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.



हेही वाचा

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळा


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा