सचिन वाझेंच्या सोसायटीमधून सीसीटीव्ही, डीव्हीआर गायब

एनआयएकडून वाझे राहत असलेल्या ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्समधील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही व डीव्हीआरचा शोध घेतला जात आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर गायब झाल्याचं समोर आलं.

सचिन वाझेंच्या सोसायटीमधून सीसीटीव्ही, डीव्हीआर गायब
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कार ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यप्रकरणी सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. एनआयएकडून आता पुरावे गोळा केले जात आहे. 

एनआयएकडून वाझे राहत असलेल्या ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्समधील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही व डीव्हीआरचा शोध घेतला जात आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर गायब झाल्याचं समोर आलं. हे फुटेज आणि डीव्हीआर वाझे यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी नेल्याचं समोर आलं आहे. एनआयच्या टीमने त्या डीव्हीआर पुन्हा एकदा मिळवल्या आहेत.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्याच्या दोन दिवसानंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता टीमने वाझे राहत असलेल्या मुंबई-आग्रा रोडवरील साकेत को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसाटीला भेट दिली होती. यावेळी टीम सीसीटीव्ही आणि डीव्हीआर घेऊन गेली होती.

सोसायटीच्या एका नागरिकाने सांगितलं की,  गुन्हे शाखेचे चार लोक २७ फेब्रुवारीला सोसायटीच्या क्लब हाऊस येथे आले आणि त्यांनी डीव्हीआर जप्त करण्यास सांगितले. यावर सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की कोणत्याही लेखी आदेशाशिवाय त्यांना डीव्हीआर देऊ शकत नाही.यानंतर पोलिसांपैकी एकाने त्यांना लेखी नोट दिली. ज्यावर असं लिहिले होतं की, 'कलम CRPC नुसार आम्ही साकेत सोसायटीला नोटीस देत आहोत की मुंबई गुन्हे शाखा, CIU, DCB, CID मुंबईला कलम २८६, ४६५, ४७३, IPC १२० (B), इंडियन एक्सप्लोसिव्ह अॅक्टमध्ये दाखल FIR क्रमांक ४०/२१ च्या तपासासाठी साकेत सोसाइटीचे दोन्ही व्हिडिओ रेकॉर्डर हवे आहेत. नोटिशीत तपासाला सहयोग करण्याचा आदेशही देण्यात आला होता.

एनआयएच्या पथकाने सोमवारी इमारतीच्या सुरक्षारक्षकासह काही रहिवाशांकडे चौकशी केली. त्यानंतर हे सर्व समोर आलं.  



हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा