ती भरती प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद


ती भरती प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद
SHARES

मुंबई - महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून झालेल्या भरती प्रक्रियेत तब्बल 200 हून अधिक उमेदवार जखमी झाल्यानं ही भरती प्रक्रिया वादाच्या
भोव-यात सापडली होती. मात्र या संपूर्ण भरती प्रक्रियेचे रेकॉर्डिंग सीसीटिव्ही कॅमे-यात केल्याचा खुलासा अग्निशमन दलाकडून करण्यात आलंय. मात्र अग्निशमन दलाची माहिती समाधानकारक नसून, रेकॉर्डींगची
कॅसेट मिळावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. अग्निश्मन दलामध्ये " अग्निशामक " या 774 पदासाठी सुमारे 15 हजार उमेदवारांनी अर्ज केला होता. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ही भरती प्रकिया पार पडली होती. यावेळी घेतलेल्या चाचणी परिक्षेत उमेदवारांना 19 फुटांवरून उडी मारण्यास सांगण्यात आल्यानं सुमारे 200 उमेदवार यात जखमी झाले होते . तर एका उमेदवाराच्या पायाचे हाड मोडल्याची तक्रार मनसेच्या संतोष धुरी यांनी केली होती. तसेच जंपिंग सीटच्याखाली गाद्या टाकण्यात आल्या नव्हत्या. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोपही धुरी यांनी केला होता. यासंदर्भात धुरी यांनी अग्निशमन दलाकडे लेखी माहिती मागितली होती. भरती प्रक्रियेसाठी २३ जंपिंग शीट ठेवण्यात आल्या होत्या. तसेच जंपिंग शीटच्या दहा बाय दहा फूट जागेमध्ये एकावर एक अशा ८ ते १० गादयांचा वापर करण्यात आल्याचेही अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा