सीसीटीव्हीत कैद झाली बुरख्याआडची चोरी


SHARES

ज्वेलरी दुकानातून तीन बुरखाधारी महिलांनी अत्यंत चलाखीने सोन्याच्या अंगठ्यांनी भरलेला डबाच लंपास केल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली. मात्र चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेनंतर तिन्ही महिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पोलिसांनी सर्व दुकानमालकांना आवाहन केले आहे की, दुकानात येणाऱ्या बुर्खा परीधान केलेल्या प्रत्येक महिलेचा चेहरा झाकलेला नसावा, जेणेकरून चोरीचा प्रकार घडला तर आरोपीला पकडण्यास मदत होईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 एप्रिलला शिवाजीनगरमधील वर्धमान ज्वेलर्समध्ये दुपारच्या दरम्यान तीन बुरखाधारी महिला अंगठी खरेदी करण्याचा बनाव करून दुकानात शिरल्या. त्यानंतर दुकानातल्या महिला कर्मचाऱ्याला अंगठी दाखवण्याची मागणी केली. पण जेव्हा दुकानातली महिला कर्मचारी या तिघांना अंगठी दाखवू लागली तेव्हा त्या तिघी महिला एकमेकींच्या अगदी जवळ बसल्या होत्या. त्यावेळी अत्यंत चलाखीने त्या सोन्याच्या अंगठीनी भरलेला डबा आपल्या बॅगेत टाकत तिथून काढता पाय घेतला. मात्र दुकानमालकाने संध्याकाळी जेव्हा सर्व वस्तूंची मोजमाप केली तेव्हा त्यामधील 41 अंगठ्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर दुकानमालकाने सीसीटीव्हीची तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा