मुजोर पोलिसांची दादागिरी सीसीटीव्हीत कैद


SHARES

मलाड - दिंडोशी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनी एका तरुणाच्या दुचाकीला आधी पाठून धडक देत त्याला मारहाण केली आणि त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. त्या तरुणाचं नाव हुसेन पटेल असून याप्रकरणी त्यानं सीसीटीव्हीची दृष्य वरिष्ट पोलीस निरीक्षकांना देत पत्रातून न्यायाची मागणी केलीय.
हुसेन पटेल हा तरुण मालाड (पू.), दिंडोशी डेपोच्या मागे असलेल्या मोती इमारतीतला रहिवासी आहे. 2 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान तो गोरेगाव उड्डाणपुलाजवळ असलेल्या लकी हॉटेलकडे येत होता. तेव्हा मागून आलेल्या एका मोटारसायकलनं हुसेनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी मागून धडक दिलेल्या दुचाकीवरील दोघे जण पडले. ज्यामुळे हुसेन तिथेच थांबला. तेव्हा त्या दोन बाइकस्वारांनी हुसेनला मारहाण केली.
त्यानंतर हुसेनला दिंडोशी पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ते दोघेही पोलीस असल्याचं समजलं. त्या दोघांचं नाव किरण सानप आणि राजेश पांडे आहे. त्या दोन्ही पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचं हुसेनचं म्हणणं आहे.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त किरण कुमार यांनी सांगितलं की, ते दोन्ही पोलीस कर्मचारी ड्यूटीवर नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूने गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर हुसेनची आई आयशा यांचं म्हणणं आहे की, पोलिसांची चूक सीसीटीव्हीच्या दृष्यातून स्पष्ट दिसतेय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा