तिकिटांच्या काळा बाजारामुळे मध्य रेल्वेला ६१ लाखांचा तोटा

तिकीट दलाल बनावट युजर आयडी वापरून रेल्वेची तिकिटे आरक्षित करणे, तिकिटाचे बेकायदेशीर हस्तांतरण करणे आदी प्रकारे तिकिटांचा काळा बाजार करतात.

तिकिटांच्या काळा बाजारामुळे मध्य रेल्वेला ६१ लाखांचा तोटा
SHARES

शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने रेल्वेने मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही संधी साधून तिकीट दलाल बनावट युजर आयडी वापरून रेल्वेची तिकिटे आरक्षित करणे, तिकिटाचे बेकायदेशीर हस्तांतरण करणे आदी प्रकारे तिकिटांचा काळा बाजार करतात. हा काळा बाजार रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या ५ विभागात रेल्वे पोलिसांनी कारवाई करत ९ महिन्यात २ हजार ५७७ तिकिटे जप्त केली आहेत. या तिकिटांची किंमत ६१ लाख ८९ हजार ३३८ रुपये असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सणासुदीच्या काळात दलालांकडून आधीच तिकिटांची खरेदी करत प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. मध्ये रेल्वेच्या पाच विभागातून तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत होता. तिकिटांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी मध्ये रेल्वेवरील महत्वाच्या स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत तब्बल ६१ लाख ८९ हजार ३३८ रुपयांची २५७७ तिकिटे जप्त केली आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात रेल्वे पोलिसांनी ही कारवाई करत अनेक दलालांना अटक केली.

दलालांकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात आरक्षण केलं जातं. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट मिळत नाही. तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे राहतात. आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार असल्यामुळे तिकीट मिळणं कठीण होतं. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी या दलालांकडून जादा पैसे देऊन तिकीट घेतात.हेही वाचा -

गुंगीचं औषध देऊन मालकिणीला १.३१ कोटींना ठगवलं

३२२ पीएसआयच्या भरतीला न्यायालयाकडून हिरवा कंदील?
संबंधित विषय