अमली पदार्थाची तस्करी करणारे अटकेत

 Mazagaon
अमली पदार्थाची तस्करी करणारे अटकेत

भायखळा - अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेेल्या दोघांना भायखळा पोलिसांनी अटक केलीय. मोहम्मद नुराल्ला खान (२६), मोहम्मद जावेद शेख (२९) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. याप्रकरणी एक जण फरार आहे. या दोघांकडून 1 किलो 70 ग्रॅम इतके अमली पदार्थ जप्त केले. रे रोड परिसरातील बॅरिस्टर नाथ पै रस्त्यावर काही संशयीत अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस पथकानं सापळा रचून दोघांना अटक केली. 

Loading Comments