तरुणाला लुटणारा अटकेत

 Pali Hill
तरुणाला लुटणारा अटकेत

ट्रॉम्बे - रस्त्याने जात असलेल्या एका तरुणाला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल आणि पैसे घेऊन पळ काढणाऱ्या एका आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. राजकुमार यादव (३२) असे या तक्रारदार तरुणाचे नाव असून तो मानखुर्द परिसरात राहणारा आहे. गुरुवारी दुपारी सायन-ट्राँम्बे रोडवरुन घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी एका तरुणाला रस्त्यात अडवत मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल फोन आणि बाराशे रुपये रोख असा मुद्देमाल घेउन पोबारा केला. याच दरम्यान तरुणाने आरडाओरडा केल्याने एका रिक्षा चालकाने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर दुसऱ्या आरोपीचा ट्रॉम्बे पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments