सावधान! सायबर चोरटे अशी करू शकतात फसवणूक


सावधान! सायबर चोरटे अशी करू शकतात फसवणूक
SHARES
कोरोनाचा विषाणू संसर्ग वाढल्याने सर्व बँकांनी  त्यांच्या सर्व ग्राहकांना शक्य तितक्य डिजिटल बँकिंग सुविधेचा वापर करण्यास प्रोत्साहित केले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजीटल बँकिंग सुविधेचा गैरवापर करून नागरीकांची फसवणूक करीत असल्या बाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी सायबर गुन्हे करण्याचा नवीन मार्ग शोधला असून त्याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.


लाॅकडाऊनमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. त्यामुळे विविध बँकांनी त्याच्या ग्राहकांना त्यांचे कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार बँक अधिकारी, कर्मचारी बोलत असल्याचे भासवून  बँक खात्याशी संबंधित पिन, सीसीव्ही, ओटीपी इत्यादी माहिती प्राप्त करून फसवणूक करत आहेत. तसेच, सायबर गुन्हेगार ग्राहकांना बँकेच्या नावे एसएमएस पाठवून त्याद्वारे एनी डेक्स, क्विक सपोर्ट, टीम व्हिवर इत्यादी वेगवेगळे स्क्रिन शेअरिंग अॅप्स डाउनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईल आणि संगणकाचा अनधिकृत ताबा घेऊन  फसवणूक करत आहेत. य्ाातील आरोपी बँकेचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून ग्राहकांकडून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती तसेच त्यांचे मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी नंबर देण्यास भाग पाडत आहेत.


त्यानंतर एखादे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे बँक खात्याची माहिती आणि ओटीपी नंबर प्राप्त करून ग्राहकांच्या बँक खात्य्ाातून रक्कम काढून फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांचे कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकेकडून एसएमएस प्राप्त झाल्यास किंवा बँकेचा अधिकारी, कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागितल्यास देऊ नये किंवा समोरील व्य्ाक्तीने सांगितल्यानुसार कोणतेही अॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाउनलोड करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे
संबंधित विषय