घरासाठी धरणं आंदोलन


घरासाठी धरणं आंदोलन
SHARES

घाटकोपर - रामजीनगर येथील रहिवाशांनी हक्काच्या घरासाठी रविवारपासून धरणं आंदोलन सुरू केलंय. सिंहगड आणि सिंधुदुर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडीधारकांनी 2006 मध्ये विकासकासोबत करार करून पुनर्निमाणासाठी झोपड्या दिल्या. झोपडपट्टीतील रहिवासी विकासकाने बांधून दिलेल्या संक्रमण शिबिरात राहत आहेत. या जागेवर दुमजली बांधकामाशिवाय काहीच झालेलं नाही. याविषयी रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यालयाकडे तक्रार केली. पण, भारतीय विमानोड्डाण प्राधिकरणाकडून 22 मजली इमारतीला परवानगी दिली नाही. या विभागातूनच विमानं उतरतात. ही परवानगी मिळत नाही म्हणून साडेतीनशे झोपडीधारक आपल्या हक्काच्या घरासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करत आहेत. पण, अजून तरी झोपडीधारकांना त्यांची घरं मिळालेली नाहीत. हक्काचं घर मिळविण्यासाठी शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं ठरवल्याचं सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर शेट्टी यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा