नोकरीचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक


नोकरीचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
SHARES

हवाई सुंदरीं म्हणून नोकरीला लावण्याचं आमिष दाखवून दोन तरुणींची फसवणूक करणाऱ्यास पवई पोलिसांनी अटक केली आहे. नासीर हुसैन मोहिनुद्दीन खान असं या आरोपीचं नाव आहे. याआधीही नासीरवर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्हयांची नोंद आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


अशी केली फसवणूक

पवई परिसरात राहणारी तरुणी हवाई सुंदरीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळे ती चांगल्या कंपनीत हवाई सुंदरी म्हणून नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी एका संकेतस्थळावर तिने हवाई सुंदरीबद्दल अपलोड करण्यात आलेली जाहिरात वाचली. त्यावेळी संबधित संकेतस्थळावर तरुणीने फोन लावून नोकरीबाबत विचारणा केली असता नासीरने तिला २ लाख रुपये भरावे लागतील असं सांगितलं. त्यानुसार आगाऊ रक्कम म्हणून तरुणीने साठ हजार रुपये नासीरला दिले. त्यानुसार नासीरने तरुणीला कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता देऊन नियुक्ती पत्र दिलं. त्यानंतर तरुणी तिथे गेली असता अशा प्रकारे कोणतीही नियुक्ती करण्यात आली नसल्याचं तिला सांगण्यात आले.


पवई पोलिसांत तक्रार

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पवई पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार नासीरला शनिवारी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. पोलिस चौकशीत नासीर हा सराईत आरोपी असून त्याच्यावर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचं पुढे आलं. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा