अंधेरीच्या कॅनरा बँकेत चोरांची हेराफेरी

  मुंबई  -  

  अंधेरीच्या कॅनरा बँकेत एक धक्कादायक घटना घडलीय. ऑफिसची 1 लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी आलेल्या एका गृस्थाची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. विनोदकुमार शर्मा असं फसवणूक झालेल्या गृहस्थांचं नाव आहे. सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ असला तरी आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलं नाही.

  बँकेत विनोद स्लिप भरण्यासाठी येतात. त्यांच्यापाठोपाठ तीन अनोळखी इसम बँकेत येतात. तिघांपैकी एक विनोद यांना सरकारने नवीन नियम काढला आहे असे सांगतो. नियमानुसार नोटेवरील नंबरदेखील तुम्हाला स्लिपमध्ये लिहणं गरजेचं आहे, अशी बतावणी करतो. 100 नोटांचे नंबर स्लिपवर लिहायचे कसे? हा प्रश्न विनोद यांना पडतो. विनोद यांना मदत करण्याच्या नावाखाली दोघं 1000 रुपयांचं एक-एक बंडल हाती घेतात आणि संधी साधून पळ काढतात. अशा प्रकारे तिघं विनोद यांचे 69 हजार रुपये हातचलाखीने लंपास करतात. जेव्हा विनोद पैसे भरण्यासाठी काउंटरवर गेले तेव्हा 1 लाखाच्या जागी फक्त 31 हजार असल्याचं त्यांना कळालं. तुमच्यासोबत अशी कुठली घटना होऊ नये यासाठी सतर्क रहा, असं आवाहन मुंबई लाइव्ह करतेय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.