चेंबूरच्या हत्याप्रकरणाचा तपास केरळमध्ये

 Chembur
चेंबूरच्या हत्याप्रकरणाचा तपास केरळमध्ये
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - चेंबूरमधल्या सोने व्यापारी हत्येप्रकरणी पोलिसांनी अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. शनिवारी चेंबूरच्या कमला गेस्ट हाउस या हॉटेलमध्ये एका व्यापाऱ्या हत्या झाली होती. कामनिमित्त केरळहून मुंबईत आलेल्या या व्यापाऱ्यासोबत दोन दिवसांपासून एक व्यक्ती देखील राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चेंबूर पोलिसांची दोन पथकं या व्यक्तीला शोधण्यासाठी केरळमध्ये दाखल झाले असून लवकरच या हत्येचा छडा लावण्यात येईल असा दावा चेंबूर पोलिसांनी केला आहे.

Loading Comments