मुंबईच्या व्यापाऱ्याची बॅग पुण्यात चोरीला


SHARE

मुंबई - चेन्नईवरून दादरला येणाऱ्या एका व्यापाऱ्याची झोप त्यावेळी उडाली जेव्हा सीट खाली ठेवलेली त्याची बॅग एकाएकी गायब झाली. जे. सुरेश नावाचे व्यापारी चेन्नईहून मुंबईला येत होते, रात्री दोनच्या सुमारास ट्रेन पुण्याला पोचते ना पोचते तोच सुरेश यांची बॅग चोरीला गेली.

"दोन वाजून दहा मिनिटांनी जाग आली तेव्हा बॅग सीट खाली असल्याचं बघितल्यानंतर डुलकी लागली, त्यानंतर 20 मिनिटांनी जाग आली तेव्हा मात्र बॅगेचा कुठेच पत्ता नव्हता, त्या डब्यातील आणखी एका प्रवाशाची देखील बॅग चोरीला गेल्याचं जे. सुरेश यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं''.
बॅगेमध्ये 2 हजार रुपये एटीएम कार्ड ओळखपत्र तसंच कपडे होते. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत ट्रेनमधल्या तिकीट तपासणीसला सांगितलं. या प्रकरणी ते तक्रार देखील करणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या