सीएसटी स्थानकातून चिमुकलीचे अपहरण


सीएसटी स्थानकातून चिमुकलीचे अपहरण
SHARES

 मुलीच्या आईचा विश्वास संपादन करून एका पुरुष आणि महिलेनं गजबजलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून एका दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या नजरेखाली हा सगळा प्रकार घडला. मात्र कुणी या अपहरणकर्त्यांना अडवू शकले नाही. 

 शुक्रवारी रात्री वर्षा आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन बुलढाण्याला आपल्या माहेरी निघाली होती. बुलढाण्याकरता शेवटची गाडी चुकल्यानं वर्षाला सीएसटीला थांबणे भाग पडले. वर्षाला एकटी बघून एका जोडप्यानं तिच्याशी संवाद साधला. गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी या दोघांचा खरा चेहरा समोर आला. वर्षाला गाढ झोपलेलं पाहून या महिलेनं वर्षाच्या कुशीतून मुलीला अलगत उचलले आणि सीएसटी स्थानकातून पळ काढला.याप्रकरणी अज्ञात पुरूष आणि महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला असल्याची माहिती सीएसटी जीआरपीचे पोलीस निरीक्षक चौगुले यांनी दिली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा