COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

चीनी कंपन्यांच्या मदतीने सुरू होती हेरगिरी, ३० कोटींचा महसूल बुडवला

आठ महिन्यांपासून ३० लाख दूरध्वनी करण्यात आले असून सरकारचा २० कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला आहे.

चीनी कंपन्यांच्या मदतीने सुरू होती हेरगिरी, ३० कोटींचा महसूल बुडवला
SHARES

भारत आणि चीन मध्ये मागील काही दिवसांपासून टोकाचे संबध बिघडले असताना. चीनकडून बनावट टेलिफोन एक्सचेंजद्वारे हेरगिरी सुरू असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंवडी येथे सुरू असलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात चीन आणि पाकिस्तानकडून आठ महिन्यांपासून ३० लाख दूरध्वनी करण्यात आले असून सरकारचा २० कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काश्मिरबाबत भारताकडून काय हालचाली सुरू आहेत. भारताकडे युद्ध सामग्री किती आहे. याची ही माहिती काढण्यात आल्याचे बोलले जाते. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

हेही वाचाः- सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

मुंबईच्या गोवंडी परिसरातून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजद्वारे हे गुप्तहेर जम्मू काश्मिरमधल्या, आर्मीच्या हालचालींची माहिती द्याचया, तो प्रामुख्याने दुबई, पूच्छ आणि राजोरी परिसरातील माहिती या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने पाकिस्तानमध्ये पुरवायचा, याबाबत जम्मू काश्मिर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कळवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १९१ सिम कार्ड असलेली टेलिफोन एक्सचेंज मशीन, लँपटाँप, मोबाइल आणि इतर साहित्य हस्तगत केली आहेत. या आरोपीचा ताबा आता 'एनआयए' तपाय यंञणेकडे सोपवण्यात आला होता. समीर अलवारी(३८) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्या संबंधीत इतर माहितीही घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय ठेऊन आहेत. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानकडून मागील आठ महिन्यांपासून ३० लाख दूरध्वनी करण्यात आले असून सरकारचा २० कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला असल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचाः- पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक

कसा करतात वापर

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमध्ये सिमबॉक्स इंटरनेट कनेक्शनला राउटरच्या माध्यमातून जोडले जातात आणि परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल राऊट करून भारतातील मोबाइल नंबर किंवा लॅण्डलाइनशी जोडले जातात. एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कॉलचे डोमॅस्टिक कॉलमध्ये रूपांतर केले जातात. हा फसवणुकीचा प्रकार असून भारताची कोणतीही सुरक्षा यंत्रणा हे आंतरराष्ट्रीय कॉल पकडू शकत नाही. डिओटीकडेही या कॉलची नोंद होत नसल्याने सरकारहि आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा