सिगारेटच्या पाकिटांतून आढळले जिवंत काडतूस, दोघांना अटक


सिगारेटच्या पाकिटांतून आढळले जिवंत काडतूस, दोघांना अटक
SHARES

मुंबईच्या खंडणी विरोध पथकाने सिगारेटच्या पाकिटातून जिवंत काडतूसाची तस्करी करणाऱ्या दोघांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. अनिल निर्मल सिंह (२४) आणि वाहिद अली दाऊद अली शेख (२६) अशी या दोन आरोपींची नावं आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी ९ जिवंत काडतुसांसह ७.६५ बोअरचे पिस्तुल, एकलाखांची रोकड आणि मोबाइल हस्तगत केले आहेत.

वर्सोवाच्या जे. पी. रोडवरील गंगा भवन बिल्डिंगसमोर राहणारा अनिल सिंह हा शस्त्रांची तस्करी करत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिल याला पकडण्यासाठी पोलिसांनी मुंबई सेंट्रल येथे सापळा रचला होता.


सापळा रचून केली कारवाई

अनिल हा तेथे संशयित रित्या फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी अंग झडतीत पोलिसांना त्याच्या खिशात सिगारेटचं पाकिट आढळून आलं. त्या पाकिटात ७.६५ बोअरचे पिस्तुलीसाठी वापरली जाणारी ९ जिवंत काडतुसं आढळल्यानंतर पोलिसांनी अनिलला अटक केली. त्यावेळी ही काडतुसे त्याने तेलंगणा येथील आपला मित्र वाहिदला देण्यासाठी आपल्याजवळ बाळगल्याचं सांगितलं.

पोलिसांनी अनिलच्या मदतीने वाहिदला अंधेरी येथे भेटण्यासाठी बोलवून ताब्यात घेतले. या मागचा मुख्य सूत्रधार कोण याचा आता पोलिस शोध घेत आहे. या प्रकरणी न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा