खेळण्यात सापडल्या 85 लाखांच्या सिगरेट्स

 Nhava Sheva
खेळण्यात सापडल्या 85 लाखांच्या सिगरेट्स

न्हावा-शेवा - इथल्या आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलवर तब्बल 85 लाखांच्या परदेशी सिगरेट्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. कस्टम आणि इतर सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी या सिगारेट खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवण्यात आल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलवर सिगरेटचा मोठा साठा लपवण्यात आल्याची माहिती 'डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स'ला (डीआरआय) मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. छापा टाकला असता परदेशी बनावटीच्या सिगरेट्स खेळण्याच्या खोक्यात लपवल्याचं डीआरआयला आढळलं. जप्त करण्यात आलेल्या एकूण 133 खोक्यांपैकी 92 खोक्यात खेळणी तर उर्वरित 41 खोक्यात सिगरेट्सचे बॉक्स होते. सध्या डीआरआयने डनहिल, गुंडन गरम 555, बेन्सन अँड हेजेस ब्रॅण्डच्या आठ लाख नव्वद हजार सिगरेट्स जप्त केल्या आहेत. ज्यांची एकूण किंमत 85 लाखांच्या घरात आहे. विशेष, म्हणजे ज्या खेळण्यातल्या गाड्यांच्या खोक्यात या सिगरेट लपवण्यात आल्या होत्या, त्यांना सिगरेट्सचा वास येऊ नये म्हणून अतिशय पद्धतशीरपणे पॅक करण्यात आलं होतं. या सिगरेट्स नेमक्या कुणाच्या आहेत याचा सध्या डीआरआय तपास करत आहे.

Loading Comments