सीआयएसएफच्या जवानाची स्वतःला गोळीमारून आत्महत्या

मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या सुरक्षेस तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानानं शनिवारी स्वतःच्या रायफलनं गोळी मारून आत्महत्या केली. भवरलाल नाईक असे जवानाचे नाव आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

सीआयएसएफच्या जवानाची स्वतःला गोळीमारून आत्महत्या
SHARES

मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या सुरक्षेस तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) जवानानं शनिवारी स्वतःच्या रायफलनं गोळी मारून आत्महत्या केली. भवरलाल नाईक असं जवानाचे नाव आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.


नेमका काय प्रकार घडला

भवरलाल याची तीस्ता सेटलवाड यांच्या जुहू तारा रोड इथल्या निवासस्थानी नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. भवरलाल हा नुकताच ३൦ दिवसांच्या सुट्टीवरून ड्युटीवर हजर झाला होता. शनिवारी भवरलाल हा सेटलवाड यांच्या घराच्या मागच्या बाजूला गस्तीवर होता. सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास त्यानं हनुवटीखाली रायफल ठेवत गोळी चालवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


आत्महत्येप्रकरणी समांतर चौकशीचे आदेश 

याप्रकरणी समांतर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सीआयएसफच्या एका अधिका-यानं दिली. आत्महत्या करताना भवरलाल त्याठिकाणी एकटाच होता. त्यामुळे नेमकं काय घडलं हे अद्याप स्पष्ट नाही. पण त्याच्या मृतदेहाच्या शेजारी रायफल पडलेली सापडली. प्राथमिक पाहणीत रायफलमधूनच गोळी झाडण्यात आल्याचं दिसून आलं. नाईक मुंबईत नुकताच तैनात झाल्यामुळे सीआयएसएफमधील इतर सहकाऱ्यांनाही त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. 



हेही वाचा

मुंबई पोलिस आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार

   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा