'यूपी'चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका, पोलिस मुख्यालयात निनावी फोन


'यूपी'चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका, पोलिस मुख्यालयात निनावी फोन
SHARES
कट्टर हिंदूत्वाचे प्रचारक आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंञी योगी आदीत्यनाथ यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लखनऊ पोलिस मुख्यालयातील सोशल मीडिया हेल्प डेस्कवर निनावी संदेश फोनद्वारे योगी आदीत्यनाथ यांना बाँम्बस्फोट करून त्यांची हत्या करणार असल्याचे धमकवण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसने गोमतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

यूपीत आधीच कोरोनाने हाहाकार माजवला असताना, उत्तरप्रदेशचे मुख्यमंञी योगी आदीत्यनाख हे कोरोना संसर्ग रोगावर नियंञण मिळवण्यासाठी प्रशासनामार्फत शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यातच मुंबईसह इतर प्रमुख राज्यातून उत्तरप्रदेशमध्ये लोंढेच्या लोढे परतत आहे. अशातच लखनऊच्या पोलिस मुख्यालयात योगी आदीत्यनाथ यांना बाँम्बने उडवून ठार मारण्याची धमकीचा फोनने उत्तरप्रदेश  पोलिसांची झोप उडाली होती. उत्तरप्रदेश एटीएसने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आदीत्यनाथ यांची रातोरात सुरक्षा वाढवली. तपासात हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी परिसरातून आल्याचे कळताच, यू पी एटीएसने  मुंबई एटीएसकडे मदत मागितली. मुंबईच्या एटीएस पथकाने अवघ्या काही तासात चुन्नाभटी परिसरातून योगी आदीत्यनाथ यांना धमकवणाऱ्यास अटक केली.

चुनाभट्टी येथील म्हाडा कॉलनीत आरोपी कामरान आमीर खान (25) राहतो. शुक्रवारी त्याने यूपीच्या लखनऊ पोलिस मुख्यालयात फोन करून धमकावल्याची पोलिसांना कबूली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात धमकी देणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर त्याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले. त्याचा ताबा उत्तर प्रदेश एसटीएसफच्या ताब्यात देण्यात आले. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून ट्रान्झीट रिमांडची मागणी करण्यात येणार आहे.
संबंधित विषय