मुंबई विमानतळावर 18 कोटींचं कोकेन जप्त


मुंबई विमानतळावर 18 कोटींचं कोकेन जप्त
SHARES

मुंबई - मुंबई विमानतळावर एका महिलेकडून 18 कोटींचे कोकेन पकडले गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 3 किलो कोकेन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी) जप्त केले आहे. 

या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने खैनटे लालथालमुआनी नावाच्या महिलेला अटक केली आहे. सोमवारी एनसीबीला खबर मिळाली की लोमवरून येणाऱ्या एका महिलेकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असू शकतात. त्यामुळे लोमवरून इथियोपियन एयरलाईनने मुंबई विमानतळावर उतरलेल्या खैनटे लालथालमुआनी नावाच्या महिलेला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. तिच्या हॅन्डबॅगेची तपासणी केली असता त्यात 18 कोटींचे कोकेन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती लागले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा