कुलाब्यात महिलेची गळा चिरून हत्या

  Colaba
  कुलाब्यात महिलेची गळा चिरून हत्या
  मुंबई  -  

  भर दिवसा घरात घुसून एका महिलेची हत्या झाल्याची घटना मुंबईच्या कुलाबा परिसरात घडली आहे. श्वेता तांडेल (29) असे या महिलेचे नाव असून गळा चिरून तिची हत्या झाल्याचे समोर येत आहे. या महिलेच्या घरातून कोणतीही वस्तूू चोरीला न गेल्याने हत्येमागचे गूढ वाढली आहे.

  श्वेता आपल्या पतीसोबत कुलाबाच्या सुंदरनगरमध्ये रहात होती. बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान नेहमीप्रमाणे तिचा पती मयूर आणि दिर हे कामावर गेले होते. तेव्हा सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या घरातील हितेश नावाचा मुलगा देखील कामावर गेला होता. त्यानंतर काय झाले हे कोणालाच समजले नाही. दुपारच्या दरम्यान घरातील एसी चालू असून देखील श्वेता हाकेला उत्तर का देत नाही, हे बघण्यासाठी खाली रहाणारी एक महिला तिच्या घरात गेली असता ती घरात पडलेली आढळली, तिच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. हे पाहून त्या महिलेने तिला तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

  एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या श्वेताने 15 दिवसंपूर्वी नोकरी सोडली होती. त्यात घरातून कोणतेही सामान चोरीला न गेल्याने हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू देखील अद्याप सापडलेला नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.