SHARE

गोरेगाव - इराणीवाडी इथं राहणाऱ्या एका कुटुंबावर सोमवारी रात्री अॅसिड हल्ला करण्यात आला. यात कुटुंबातील तिघं जखमी झाले. त्यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरुयेत. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय.

फिर्यादी हा एका बांगडी पॉलिशच्या दुकानात कामाला आहे. त्याच्यासोबत काम करत असलेल्या दोघांसोबत त्याचा वाद झाला होता. त्या वादातूनच त्याच्या दोन सहकार्ऱ्यांनी दरवाजाच्या फटीतून अॅसिडची पिशवी फेकली. यात फिर्यादी 70 टक्के भाजलाय. त्याची पत्नी 20 टक्के आणि चार वर्षांचा मुलगा 25 टक्के भाजलाय. याप्रकऱणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या