राज्यभरात 5 दिवसांत 155 हून अधिक गुन्हे दाखल


राज्यभरात 5 दिवसांत 155 हून अधिक गुन्हे दाखल
SHARES

पाच दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला बुधवारी हिसंक वळण लागलं. या पाच दिवसांत राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यात 155 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यभरात 86हून अधिक ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असून हजारो मराठा आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुरांचा वापर करावा लागला.


86 ठिकाणी दगडफेक

राज्यभरात 20 जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या दुर्लक्षतेमुळे आंदोलनकर्त्यांनी मोर्चाला हिसंक वळण दिलं. त्यात काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानानंतर प्रकरण आणखी चिघळलं. मराठा मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात पाच दिवसांत 135 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 20 जुलैला 19 गुन्हे, 21 जुलैला 20 गुन्हे, 22 जुलैला 30, 23 जुलैला 27 गुन्हे दाखल झाले होते. तर बुधवारी नवी मुंबई, ठाणे, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर, पालघर, रायगड आदी ठिकाणी  86 ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.


दोन ठिकाणी अश्रूधुरांचा वापर

साताऱ्यात आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस अधिक्षकांसह दोन पोलिसही जखमी झाले होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी दोन ठिकाणी अश्रूधुरांचा वापर करण्यात आला. तर औरंगाबाद येथे जमावाला पांगवताना त्यांच्या मागे धावणारे पोलिस हवालदार लक्ष्मण कडगावकर यांचा हृदयविकाराच्या झटक्‍यानं मृत्यू झाला.


आंदोलनाला हिंसक वळण

परिस्थिती हाताबाहेर गेली ती नवी मुंबईत, आंदोलन थोपवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आंदोलकांवर खाकीचा धाक दाखवल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. खाकीला प्रत्युत्तर म्हणून संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानं पोलिसांनी जमावावर अश्रूधुरांचा वापर केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याच पेटवल्या. मानखुर्द येथेही बेस्ट बस जाळल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतलं.


हेही वाचा -

मुंबई बंद: ४४७ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा