मनोज म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज

भिवंडी - काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा दावा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय.

मनोज म्हात्रे भिवंडीतल्या अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले होते. त्यावेळी दोघांनी त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले. जखमी अवस्थेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपीटर रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान त्यांच्यावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय.

Loading Comments