ऑनलाइन लखोबा लोखंडे

कांदिवली - जर तुम्ही मॅट्रिमोनी साईटवर मुलगा शोधताय तर सावधान. तुमची फसवणूकही होऊ शकते. नुकतीच अशी एक घटना समोर आलीय. मॅट्रिमोनी साईटवर महिलेची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. आशीष मराठा असं या भामट्याचे नाव आहे. मॅट्रिमोनी साईटवर या भामट्याने बँकेत काम करणाऱ्या तरूणीला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर तिच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये उकळले. पैसे उकळल्यानंतर तिच्याशी कोणताच संबंध ठेवला नाही. तिचे कॉल उचलणेही या भामट्याने बंद केले. त्यानंतर या मुलीने पोलीस स्टेशन गाठले आणि या भामट्याविरोधात तक्रार दाखल केली.

Loading Comments