कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा मजुराच्या जीवावर बेतला

 Dharavi
कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा मजुराच्या जीवावर बेतला

धारावी - कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे एका गरीब मजुराला आपला जीव गमवावा लागल्याची घटना काळा किल्ला येथील महापालिका शाळेच्या आवारात घडली. चिंतामणी विश्वकर्मा असे मृत मजुराचे नाव आहे. याबाबत धारावी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

धारावीतील काळा किल्ला परिसरातील पालिकेच्या मराठी उच्च प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इमारत दुरुस्तीचे काम पालिका कंत्राटदाराने सुरू केले होते. इमारतीच्या बाहेरील भागात बांबूची परांची बांधण्यात आली होती. त्यावर काम करताना मजुरांकडे सेफ्टी बेल्ट, हेल्मेट (सुरक्षा कवच) असे सुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते. त्याशिवायच ते काम करत होते. त्यावेळी चिंतामणी विश्वकर्मा अचानक तोल जाऊन जमिनीवर पडला. अंगावर सेफ्टी बेल्ट, हेल्मेट (सुरक्षा कवच) नसल्याने तो त्यात जबर जखमी झाला. त्याला तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केले परंतु रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Loading Comments